नवी दिल्ली - भारतामध्ये आत्तापर्यंत कोरोनाचे 5 हजार 734 रुग्ण आढळून आले आहेत. मागील 24 तासात 549 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 166 जण दगावले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी पत्रकार परिषद दिली आहे.
देशभरात कोरोनाचे 5 हजार 734 रुग्ण, तर 166 जणांचा मृत्यू - corona live update
भारतामध्ये आत्तापर्यंत कोरोनाचे 5 हजार 734 रुग्ण आढळून आले आहेत. मागील 24 तासात 549 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
सुरक्षा उपकरणे, मास्क आणि व्हेंटिलेटरचा पुरवठा होण्यास सुरुवात झाली आहे. 20 भारतीय व्यवसायांनी सुरक्षा उपकरणांची निर्मिती सुरू केली आहे. 49 हजार व्हेंटिलेटरची ऑर्डर देण्यात आली आहे. तसेच भारतीय रेल्वेने 80 हजार विलगीकरन कक्ष तयार केले आहेत. रेल्वेविभागाने 5 हजार डब्यांचे रुपांतर विलगीकरण कक्षात केले आहे, अशी माहिती लव अगरवाल यांनी दिली.
देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन पुकारण्यात आला आहे. अशात हा लॉकडाउन वाढण्याचीही शक्यता आहे. येत्या शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे.