नवी दिल्ली - देशभरात कोरोनाग्रस्तांनी ४० हजारांचा टप्पा पार केला आहे. ताज्या आकडेवारीनुसार देशात ४२ हजार ५३३ रुग्ण झाले आहेत. यातील २९ हजार ४५३ अॅक्टिव्ह केसेस आहेत. ११ हजार ७०७ रुग्ण उपचारानंतर पूर्णत: बरे झाले असून १ हजार ३७३ जणांचा मृत्यू झाला आहे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
देशभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा ४२ हजार ५३३; तर मागील २४ तासांत २ हजार ५५३ बाधित - कोरोना भारत आकडेवारी
मागील २४ तासांत २ हजार ५५३ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मागील २४ तासांत २ हजार ५५३ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज( सोमवार) सकाळी ९ वाजेपर्यंत भारतात ११ लाख ७ हजार २३३ वैद्यकीय नमुन्यांची चाचणी करण्यात आल्याची माहिती इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिली आहे.
आजपासून देशात २ आठवड्यांसाठी तिसऱ्यांदा लॉकडाऊन सुरू झाला आहे. देशातील जिल्ह्याचे ग्रीन, ऑरेंज, आणि रेड झोनमध्ये विभाजन करण्यात आले आहे. त्यानुसार परिसरात बंधने लागू राहणार आहेत. मात्र, आज अनेक राज्यांनी दारुची दुकाने, सलून शॉप सुरू केले आहेत.