महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देशभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा 20 हजारांच्या पुढे; 652 जणांचा मृत्यू - india corona

राजधानी दिल्लीत आज दिवसभरात 92 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला.

file pic
संग्रहित छायाचित्र

By

Published : Apr 22, 2020, 9:38 PM IST

Updated : Apr 22, 2020, 11:13 PM IST

नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 20 हजारांच्या पुढे गेला आहे. एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 20 हजार 471 झाली आहे. यातील 15 हजार 859 अ‌ॅक्टिव्ह केसेस आहेत. 3 हजार 959 जण पूर्णत बरे झाले असून 652 जणांना मृत्यू झाला आहे.

राजधानी दिल्लीत आज (बुधवार) दिवसभरात 92 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला. दिल्लीतील एकूण रुग्णांची संख्या 2 हजार 248 झाली असून 48 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील कंटेनमेंट झोनची संख्या 89 झाली आहे.

पंजाबमधील पटियालात 18 नवे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. तर तेलंगणा राज्यात 15 नवे रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या 943 झाली आहे. राजधानी दिल्लीतील 71 पोलिसांचे विलगीकरण करण्यात आले आहे. सर्वजण कोरोनाग्रस्त हेड कॉन्स्टेबलच्या संपर्कात आल्याने त्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे.

Last Updated : Apr 22, 2020, 11:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details