महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देशात ४० हजारांपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त; मागील २४ तासांत २ हजार ४८७ रुग्णांची नोंद

मागील २४ तासांत देशात २ हजार ४८७ रुग्ण आढळून आले असून ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.

file pic
कोरोना संग्रहित छायाचित्र

By

Published : May 3, 2020, 7:34 PM IST

नवी दिल्ली - देशभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा आज (रविवार) ४० हजारांच्या पुढे गेला आहे. यातील २८ हजार ७० केसेस पॉझिटिव्ह असून १० हजार ८८७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. १ हजार ३०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अद्ययावत आकडेवारी जाहीर केली आहे.

मागील २४ तासांत देशात २ हजार ४८७ रुग्ण आढळून आले असून ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने RT-PCR पद्धतीने दहा लाखांपेक्षा जास्त चाचण्या केल्याचे सांगितले आहे. मागील २ दिवसांत ७० हजारांपेक्षा जास्त चाचण्या आयसीएमआरने केल्या आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू आणि राजस्थानने सर्वात जास्त चाचण्या घेत असून आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, दिल्ली आणि कर्नाटकने आणखी चाचण्या घेण्याची गरज असल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे.

गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. ४ मे पासून देशात पुन्हा २ आठवड्यांनी लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. देशातील जिल्ह्याचे ग्रीन, ऑरेंज, आणि रेड झोनमध्ये विभाजन करण्यात आले आहे. त्यानुसार परिसरात बंधने लागू राहणार आहेत.

कोरोनाशी लढणाऱ्या सर्व योद्ध्यांना आज लष्कराकडून मानवंदना दिली. विमान आणि हॅलिकॉप्टरमधून रुग्णालयांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस आणि इतर सर्वजण जे कोरोनाच्या लढाईत आघाडीवर आहेत त्यांना लष्कराकडून मानवंदना देण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details