महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देशातील कोरोना रुग्णसंख्या 24 लाखांच्या उंबरठ्यावर; 17 लाख जण कोरोनामु्क्त

देशाच्या राजधानीत शुक्रवारी 1192 नवे कोरोना रुग्ण वाढले. यामुळे दिल्लीतील रुग्णसंख्या 1 लाख 50 हजारांपेक्षा जास्त झाली आहे. दिवसभरात 11 जणांचा मृत्यू झाल्याने दिल्लीतील कोरोना मृतांची संख्या 4178 वर पोहोचली आहे. दरम्यान, भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ७४ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला बोलताना कोरोना योद्ध्यांचे कौतुक केले.

india corona update
भारत कोरोना अपडेट

By

Published : Aug 15, 2020, 3:41 AM IST

हैदराबाद- भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ७४ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून भाषण केले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी आघाडीवर काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचे कौतूक केले. यामध्ये त्यांनी डॉक्टर्स, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी, आरोग्य कर्मचारी हे भारताच्या कोरोना लढाईतील योद्धे आहेत, असे म्हणत त्यांचे कौतुक केले. देशातील कोरोना रुग्णांची संख्या 24 लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. 17 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर 6 लाख 61 हजार 595 रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती आहे. 48 हजार 40 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशातील कोरोना स्थितीची आकडेवारी

दिल्ली

नवी दिल्ली- देशाच्या राजधानीत शुक्रवारी 1192 नवे कोरोना रुग्ण वाढले. यामुळे दिल्लीतील रुग्णसंख्या 1 लाख 50 हजारांपेक्षा जास्त झाली आहे. दिवसभरात 11 जणांचा मृत्यू झाल्याने दिल्लीतील कोरोना मृतांची संख्या 4178 वर पोहोचली आहे. 790 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. दिल्लीत 1 लाख 35 हजार 108 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

महाराष्ट्र

मुंबई-राज्यात शुक्रवारी १० हजार ४८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख ०१ हजार ४४२ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ७०.०९ टक्के आहे. शुक्रवारी १२ हजार ६०८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, सध्या १ लाख ५१ हजार ५५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर शुक्रवारी ३६४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३९ टक्के एवढा आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

बिहार

पाटणा- बिहार राज्यात देखील कोरोना विषाणूचा प्रसार वाढत आहे. विधानपरिषदेचे माजी सदस्य जेडीयू नेते रविंद्र तांटी यांचे कोरोनामुळे पाटणा येथे निधन झाले. पाटणा येथील एम्समध्ये त्यांच्यावर 10 दिवसांपासून उपचार सुरु होते. शुक्रवारी 10 जणांचा बिहारमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यातील कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 484 वर पोहोचली आहे.

झारखंड

रांची- झारखंड राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सार्वजनिक ठिकाणी एखादा व्यक्ती विनामास्क दिसून आल्यास त्याला 500 रुपयांचा दंड करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. वाहतूक विभागाचे सचिव प्रत्येक जिल्ह्यातून दर आठवड्याला याचा आढावा घेणार आहेत. दरम्यान, राज्यात 20 हजार 950 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनामुळे 209 जणांचा मृत्यू झाला आहे.

राजस्थान

जयपूर- जगभरातील संशोधक, वैज्ञानिक कोरोना विषाणूवर लस बनवण्यासाठी प्रयत्नांची पराकष्टा करत आहेत. मात्र, दुसऱ्या बाजूला राजकीय नेत्यांचे कोरोना विषाणू बाबतची वादग्रस्त वक्तव्ये सुरुच असल्याचे चित्र आहे.भाजप खासदार सुखबिरसिंह जाउनापुरिया यांनी चिखलात बसले आणि शंख वाजवला तर प्रतिकार शक्ती वाढते त्यामुळे कोरोनाविरुद्ध लढायला मदत होईल, असे म्हटले. यापूर्वी एका भाजप खासदाराने चिखल शरिरावर लावला आणि योगा केला तर सर्व रोगातून मुक्त होता येते, असा दावा केला होता. दरम्यान, बारमेर जिल्ह्यातील बालटोरा येथील 10 पोलीस कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ओडिशा

भूवनेश्वर-वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे ओडिशा सरकारने कोरोना रोखण्यासाठी दिलेल्या सूचनांची पूर्तता न करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठीचा अध्यादेश आणण्याचा निर्णय घेतला आहे. साथरोग कायदा 1897 च्या तिसऱ्या भागात बदल करणार असल्याचे मुख्य सचिव असित त्रिपाठी यांनी सांगितले. दोन वर्षे कारावास आणि एक लाख रुपये दंडाची तरतूद अध्यादेशाद्वारे नियम मोडणाऱ्यांविरोधात करण्यात येणार आहे. येत्या अधिवेशनात याबाबतची दुरुस्ती कायद्यात केली जाईल. दरम्यान राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 54 हजार 630 झाली तर मृत्यूंची संख्या 324 झाली.

उत्तराखंड

डेहारडून-शुक्रवारी 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांची संख्या 147 वर पोहोचली आहे. उत्तराखंड राज्यात 11615 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. दिवलसभरात 488 जण कोरोनामुक्त झाले.राज्यात एकूण 7 हजार 544 जण कोरोनामुक्त झाले आहेत तर 3924 जणांवर उपचार सुरु आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details