उत्तर प्रदेश - राज्यात हळूहळू कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील 'केजीएमयू' रुग्णायलायत बस्ती जिल्ह्यातील काही संशयीत लोकांचे नमुने तपासणीसाठी आले होते. केजीएमयूच्या मायक्रोबायोलॉजी विभागाने केलेल्या चाचणीत संबंधीत जिल्ह्यातील एका तरुणाला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 'केजीएमयू' रुग्णायलाच्या मायक्रोबायोलॉजी विभागाकडून तसे स्पष्ट करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेश : बस्ती जिल्ह्यातील एका तरुणाला कोरोनाची लागण; राज्यात एकूण 117 कोरोनाबाधित रुग्ण - KGMU
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील 'केजीएमयू' रुग्णायलायत बस्ती जिल्ह्यातील काही संशयीत लोकांचे नमुने तपासणीसाठी आले होते. केजीएमयूच्या मायक्रोबायोलॉजी विभागाने केलेल्या चाचणीत संबंधीत जिल्ह्यातील एका तरुणाला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा...#Covid-19: धारावीतल्या 'त्या' रुग्णाचा मृत्यू; पोलिसांकडून परिसर सील
बस्ती जिल्ह्यातील काही संशयितांना जिल्ह्यातील रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना आइसोलेशन वॉर्डमध्ये ठेवले आहे. तिथे त्यांना चांगल्या प्रकारची वैद्यकीय व आरोग्य सेवा दिली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून आरोग्य विभाग या सर्व रुग्णांवर लक्ष ठेवून होता. ज्यात या रुग्णाची तब्येत खालावल्याने त्याचे नमुने केजीएमयू रुग्णालयाककडे पाठवले होते. जिथे आता या तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या रूग्णाचे वय 21 वर्षे आहे.