महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 1, 2020, 11:20 AM IST

ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ला; तीन वर्षांच्या मुलाला वाचविण्यात पोलिसांना यश

आज (बुधवारी) बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर शहरामध्ये दहशतवाद्यांनी अंधाधुंद फायरिंग केली. यामध्ये एक सीआरपीएफ जवान आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला तर दोन जवान जखमी झाले आहेत.

Terrorist Attack
जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ला; तीन वर्षांच्या मुलाला वाचवण्यात पोलिसांना यश

श्रीनगर (जम्मू आणि काश्मिर) -दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये तीन वर्षांच्या मुलाला वाचवण्यात जम्मू आणि काश्मिर पोलिसांना यश आले आहे. आज (बुधवारी) बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर शहरामध्ये दहशतवाद्यांनी अंधाधुंद फायरिंग केली. यामध्ये एक सीआरपीएफ जवान आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला तर दोन जवान जखमी झाले आहेत.

दहशतवाद्यांनी सोपोर भागात गस्त घालणाऱ्या जवांनांवर फायरिंग केली. फायरिंग सुरू असताना लहान मुलगा जवळील घरामध्ये अडकला होता. त्याची सुटका करण्यात पोलिसांना यश आले. तर जखमी जवांनाना रुग्णालयामध्ये दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी अजून सुरक्षेमध्ये वाढ केली असल्याचे जम्मू आणि काश्मिर पोलिसांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details