चेन्नई :तामिळनाडूच्या तिरुवल्लूरमध्ये एका १९ वर्षीय तरुणीने आपल्यावर अतिप्रसंग करु पाहणाऱ्या व्यक्तीची हत्या केली होती. या तरुणीवरील खुनाचा गुन्हा मागे घेत, तिरुवल्लूर पोलिसांनी तिला निर्दोष मुक्त केले आहे. तिने जाणून नाही, तर स्व-सुरक्षेच्या दृष्टीने हे कृत्य केले होते त्यामुळे तिच्यावरील गुन्हे मागे घेतले असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. पोलिसांच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
काय आहे प्रकरण..?
मिळालेल्या माहितीनुसार, दोन जानेवारीला सायंकाळच्या सुमारास ही मुलगी बाहेर गेली असता, एस. अजितकुमारने (२४) तिच्यावर हल्ला केला. त्याने तिला चाकूचा धाक दाखवत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तरुणीने प्रतिकार करत त्याला जोरात धक्का दिला, ज्यामुळे त्याच्या हातातील चाकू खाली पडला. तरुणीने तो चाकू घेत अजितच्या मानेवर वार केले, ज्यात अजितचा मृत्यू झाला. यानंतर तरुणीने जवळच्या शोलावरम पोलीस ठाण्यात जात आत्मसमर्पण केले होते. यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, अजितचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता.
पोलिसांनी केलेल्या तपासात असे समोर आले, की अजितकुमार हा तरुणीचा दूरचा नातेवाईक होता. दहावी नापास असलेला अजित बेकार आणि दारुडा होता. त्याच्या वागण्याला कंटाळून त्याची पत्नीही त्याला सोडून गेली होती. अजितवर यापूर्वीचेही काही चोरीचे गुन्हे दाखल होते, तसेच तो कायम चाकू सोबत बाळगत असे. गेल्या काही दिवसांपासून अजित या तरुणीचा पाठलाग करत असल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले होते.
कलम १०६ केले लागू..