हैदराबाद -भारतामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. लाॉकडाऊनच्या नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी हैदराबादमधील एका पोलीस कर्मचाऱ्याने नागरिकाला जबर मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलीस आयुक्त अंजनी कुमार यांनी संबधित पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे.
नागरिकाला मारहाण केल्याप्रकरणी हैदराबादच्या पोलीस कर्मचारी निलंबित - coronavirus
लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी हैदराबादमधील एका पोलीस कर्मचाऱ्याने नागरिकाला जबर मारहाण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलीस आयुक्त अंजनी कुमार यांनी संबधित पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे.

Cop suspended for beating up civCop suspended for beating up civilian in Telanganailian in Telangana
शहरातील गोवळकोंडा परिसरात गेल्या 28 एप्रिलला एचजी हनुमंतू हे गरजू लोकांना अन्न वाटप करून परत जात होते. यावेळी टोलीचौकी चेक पोस्टवर गोवळकोंडा पोलिसांनी त्यांना रोखले आणि लॉकडाऊन मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल जबर मारहाण केली. यामुळे हनुमंतू गंभीर जखमी झाले आहेत.
देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. यावेळी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लघंन करणाऱ्यावर कारवाई करण्याची मुभा पोलिसांना देण्यात आली आहे. मात्र, काही पोलीस या आधिकारांचा गैर वापर करताना पाहायला मिळत आहेत.