महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'सत्यवान-सावित्री', तिने पतीला चक्क नक्षलवाद्याच्या तावडीतून सोडवून आणले - पत्ननीने केली क्षलवाद्याच्या तावडीतून पतीची सुटका

सत्यवानाला सावित्रिने यमराजाच्या तावडीतून सोडवल्याची अख्यायिका आहे. मात्र असाच काहीसा प्रकार छत्तीसगढमध्ये घडला आहे. एका पोलीस कर्माचाऱ्याच्या पत्नीने नक्षलवाद्याच्या तावडीतून आपल्या पतीची सुटका केली आहे.

naxals
naxals

By

Published : May 14, 2020, 12:20 PM IST

बिजापूर -एक स्त्री आपल्या पतीची सुरक्षा करण्यासाठी काहीही करू शकते, याचाच प्रत्यय छत्तीसगडमध्ये आला आहे. एका पोलीस कर्माचाऱ्याच्या पत्नीने नक्षलवाद्याच्या तावडीतून आपल्या पतीची सुटका केली आहे.

बिजापूरमधील भोपाळपट्टनम पोलीस ठाण्यात तैनात कॉन्स्टेबल संतोष कट्टम (वय 48) यांचे मेच्या पहिल्या आठवड्यात गोराना गावातून अपहरण झाले होते. किराणा सामान घेण्यासाठी 4 मे ला संध्याकाळी ते घराबाहेर पडले आणि परत आले नाहीत. त्यावर नक्षलवाद्यांनी त्याचे अपहरण केल्याचे माहिती समोर आली. त्यावर फक्त काळजी करत बसण्यापेक्षा स्वतःहून प्रयत्न करण्याचे मी ठरविले, असे सुनीता यांनी सांगतिले.

नक्षलवादी घटना ह्या सुनीता यांच्यासाठी नव्या नव्हत्या. कारण, सुकमा जिल्ह्यातील जागरगुंडा भागात तिचे कुटुंब राहत असल्याने त्यांना नक्षलवाद्याविषयी माहिती होती. त्यावर संतोष यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी त्यांनी तिथल्या लोकांशी संपर्क साधण्यास सुरवात केली. 6 मे रोजी सुनीताने 14 वर्षांच्या मुलीसह स्थानिक पत्रकार आणि काही ग्रामस्थांना सोबत घेऊन पतीचा शोधण्यासाठी जंगलाच्या भागात प्रवेश केला. अखेर 6 दिवासांनी त्यांना माओवाद्यांनी भरवलेल्या जन-अदालत (कांगारू कोर्ट) मध्ये संतोष दिसला. संतोषची सुटका करण्यासाठी ग्रामस्थांनी आणि सुनीताने नक्षलवाद्यांना राजी केले आणि अखेर संतोष यांची सुखरूप सुटका झाली आहे.

स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी सोडण्यापूर्वी संतोषला इशारा दिला की, पोलीस दलात कार्यरत राहिल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील. दरम्यान ११ मे रोजी विजापूरला परत आल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली व त्यांचे निवेदन नोंदविण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details