आग्रा - शहरामध्ये शुक्रवारी 13 नवे कोरोना रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 348 वर पोहचली आहे. या नवीन 13 रुग्णामध्ये पोलीस मेस मधील स्वयंपाकी, औषध विक्रेता, दोन भाजी विक्रेते आणि एसएन मेडिकल कॉलेजचा चतुर्थ श्रेणी कर्मचारी, या 5 जणांचा समावेश असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
आग्रा पोलीस मेसमधील स्वयंपाकी कोरोनाबधित... - आग्रा
आग्रामध्ये शुक्रवारी 13 नवे कोरोना रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 348 वर पोहचली आहे.
पोलीस मेसमधील स्वयंपाकी हा दररोज सकाळ-संध्याकाळ सुमारे दीडशे सैनिकांसाठी स्वयंपाक करत होता. त्याची कोरोना तपासणी केली असता त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या पोलीसांना क्वारेंटाईन करण्यात आले आहे.
आग्रा पोलीस स्टेशन परिसरातील आणखी दोन सख्या भावांना कोरोनाची लागण झाली आहे. दोघेही भाजी विक्रेते असून ते सिकंद्रा भाजी मार्केटमधून भाजीपाला आणत होते. यापूर्वी फ्रीगंज, गांधीनगर आणि पुलीयागंज परिसरातील भाजी विक्रेते कोरोनाबाधित आढळले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 348 झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यामध्ये तुबलग जमातीच्या सदस्याची संख्या 104 आहे.