चेन्नई -केंद्र सरकारच्या नव्या ३ कृषी कायद्यांविरोधात सध्या देशभरात आंदोलन सुरू आहे. द्रविड मुनेत्र कळघम पक्षाचे प्रमुख एम.के.स्टॅलिन यांनी मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांना विधानसभेचे विशेष सत्र बोलावण्याची विनंती केली आहे. विधानसभेचे सत्र बोलवून केंद्राच्या ३ नव्या कृषी कायद्यांविरोधात ठराव मंजूर करण्यात यावा, अशी मागणीही स्टॅलिन यांनी केली आहे.
'कृषी कायद्यांविरोधात ठराव मंजूर करण्यासाठी विधानसभेचे विशेष सत्र बोलवा' - कृषी कायदे बातमी
पंजाब आणि केरळ विधानसभेने कृषी कायद्यांविरोधात ठराव मंजूर केल्यानंतर आपल्याही राज्यात याप्रकारे ठराव मंजूर करण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते स्टॅलिन यांनी केली आहे.
पंजाब आणि केरळ विधानसभेने कृषी कायद्यांविरोधात ठराव मंजूर केल्यानंतर आपल्याही राज्यात याप्रकारे ठराव मंजूर करण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते स्टॅलिन यांनी केली आहे. दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे असल्याचेही स्टॅलिन म्हणाले.
तामिळनाडू हे शेतकऱ्यांचे कर्जमाफ करणारे आणि शेतकऱ्यांना संपूर्ण शक्ती प्रदान करणारे राज्य ठरले आहे. त्यामुळे राज्य सरकारने अशा कठीण काळात शेतकऱ्यांसोबत उभे राहणे गरजेचे आहे, असेही स्टॅलिन म्हणाले. दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी केंद्र सरकारच्या नव्या ३ कृषी कायद्यांचे स्वागत केले आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचेही म्हणाले.