महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

शालेय पुस्तकात सावरकरांचा 'पोर्तुगालचे पुत्र' असा उल्लेख, राजस्थान सरकारचा प्रताप - congress

भाजप नेते वासुदेव देवनानी यांनी काँग्रेसवर कठोर टीका केली असून काँग्रेस नेत्यांनी इंदिरा गांधी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याचा सल्ला दिला आहे. इंदिरा गांधी यांनी सावरकरांना देशभक्त आणि महान क्रांतीकारक संबोधल्याचे त्यांनी सांगितले.

शालेय पुस्तकात सावरकरांचा 'पोर्तुगालचे पुत्र'

By

Published : May 27, 2019, 8:15 PM IST

जयपूर- विनायक दामोदर सावरकर हे पोर्तुगालचे पुत्र होते, असा मजकूर राजस्थानच्या शालेय पाठ्यपुस्तकात छापण्यात आला आहे. यावरून राजस्थानमध्ये चांगलेच वादंग उठले आहे. या प्रकारानंतर भाजपनेही काँग्रेस सरकारला धारेवर धरले आहे.

राजस्थान शिक्षण विभागाच्या इयत्ता १० वीच्या सामाजिक विज्ञान या पाठ्यपुस्तकात विनायक दामोरदर सावरकर हे पोर्तुगालचे पुत्र असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून राजस्थानच्या माजी शिक्षणमंत्र्यांनी राज्य सरकारला जाब विचारला असून या प्रकाराचा विरोध केला आहे.

शालेय पुस्तकात सावरकरांचा 'पोर्तुगालचे पुत्र'

राज्य सरकारने मात्र हा प्रकार हेतुपरस्सर केला नसून ही पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाकडून चूक झाल्याचे सांगितले. भाजपने काँग्रेसवर लावलेले आरोपही राज्य सरकारने फेटाळून लावले आहेत. तर माजी शिक्षणमंत्री व भाजप नेते वासुदेव देवनानी यांनी काँग्रेसवर कठोर टीका केली असून काँग्रेस नेत्यांनी इंदिरा गांधी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याचा सल्ला दिला आहे. इंदिरा गांधी यांनी सावरकरांना देशभक्त आणि महान क्रांतीकारक संबोधल्याचे त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details