महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या मुलीवर अपमानास्पद भाष्य, तरुणावर गुन्हा दाखल

उत्तर प्रदेशच्या उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी असणाऱ्या आमदार सेंगर यांच्या मुलीवर अपमानास्पद भाष्य केल्याबद्दल एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार सेंगर यांच्या मुलीवर अपमानास्पद भाष्य केल्याबद्दल एका तरूणावर गुन्हा दाखल

By

Published : Aug 4, 2019, 11:49 PM IST

उत्तर प्रदेश -उन्नाव बलात्कारचा आरोप असलेल्या आमदार सेंगर यांच्या मुलीवर अपमानास्पद भाष्य केल्याप्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल कुमार सुनिल असे या तरुणाचे नाव आहे.

उन्नाव येथील बलात्काराचा आरोप असलेल्या उत्तर प्रदेशचे आमदार कुलदीपसिंग सेंगर यांच्या मुलीविरोधात सोशल मीडियावर अपमानास्पद टीका केल्याबद्दल येथील एका युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली आहे.

उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या मुलीवर अपमानास्पद भाष्य, तरुणावर गुन्हा दाखल

अनिल कुमार सुनील या तरुणाने फेसबुकवर कुलदीप सेंगरच्या मुलीविरूद्ध अवमानकारक टीका केली होती. पीडी नगर येथे राहणाऱ्या धनंजय सिंग यांनी दिलेल्या तक्रारीनंतर अनिल कुमार सुनील विरोधात आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलीस स्टेशनचे अधिकारी दिनेश चंद्र मिश्रा यांनी सांगितले.

या नंतर अनिल याने आपली पोस्ट हटवली आणि सोशल मीडियावर दिलगिरी व्यक्त केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा...

उन्नाव रेप केस के आरोपी विधायक की बेटी पर अभद्र टिप्पणी, केस दर्ज

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details