महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दिल्लीकरांसाठी कोरोनामुळे यावर्षीचा हिवाळा अत्यंत धोकादायक - हिवाळा दिल्ली प्रदुषण बातमी

हिवाळ्यात दिल्लीतील विविध भागांमध्ये हवेची पातळी खराब ते अत्यंत खराब होते. त्यातच आता कोरोनाचा देशात प्रसार झाल्याने हा हिवाळा दिल्लीकरांसाठी आव्हानात्मक असणार आहे. उच्च दर्जाच्या मास्कचाही कदाचित पुनर्वापर करता येणार नाही, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

file pic
संग्रहित छायाचित्र

By

Published : Oct 18, 2020, 10:14 AM IST

नवी दिल्ली - दरवर्षी हिवाळ्यात दिल्लीतील प्रदुषण धोक्याची पातळी गाठत असते. यावर्षी कोरोनाचा प्रसार आणि हवा प्रदुषण या दोन्हींचा सामना दिल्लीकरांना करावा लागणार आहे. शहरात हिवाळ्यामध्ये २.५ ते १० पीपीएमपर्यंत प्रदुषण वाढते. अशा परिस्थितीत विना वॉल्वचे एन-९५ मास्क वापरण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्लीकरांना दिला आहे.

या हिवाळ्यात दिल्लीत कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. हिवाळ्यात शहरातील विविध भागांमध्ये हवेची पातळी खराब ते अत्यंत खराब पातळीवर जाते. नागरिकांना घराबाहेर निघणेही कठीण होते. तर वाहन चालकांना धुक्यातून मार्ग काढत गाड्या चालवाव्या लागतात. धुक्यामुळे अनेक अपघातही घडतात. संपूर्ण शहरावर धुक्याची चादर पसरलेली असते. वाहनांपासून होणाऱ्या प्रदुषणाबरोबरच पंजाब हरयाणा राज्यातील शेतातील आगीही दिल्लीतील हवेचा स्तर बिघडण्यास जबाबदार आहे. त्यातच आता कोरोनाचा प्रसार देशात झाला आहे.

दिल्लीत आत्तापर्यंत ३ लाखांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. तर सुमारे सहा हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील वरिष्ठ चेस्ट फिजिशयन डॉ. देशदिपक सांगतात, ज्यांना श्वसनाचा त्रास आहे त्यांनी वॉल्व असणारा एन-९५ मास्क वापरावा, असे आम्ही मागील हिवाळ्यापर्यंत सांगत आलो होतो. मात्र, यावर्षी आता परिस्थिती वेगळी असून कोरोना आणि प्रदुषण दोन्हींचा धोका एकाच वेळी आहे. त्यामुळे आम्ही वॉल्व असणाऱ्या एन-९५ मास्कचा सल्ला देणार नाही'.

यावर्षी दिल्लीकरांनी स्वत:चे रक्षण करण्यासाठी विना वॉल्वचा एन-९५ मास्क वापरण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मात्र, हा मास्क नागरिकांचे फक्त प्रदुषणापासून संरक्षण करेल, असे डॉ. देशदिपक यांनी स्पष्ट केले.

'ही खुप कठीण परिस्थिती आहे. प्रदुषण काळात नागरिक सहसा एकाच मास्कचा पुनर्वापर करतात. मात्र, कोरोनाच्या परिस्थितीत आपण एकाच मास्क अनेक वेळा कदाचित वापरु शकत नाही. मग तो मास्क महागडा असेल तरी सुद्धा वापरता येणार नाही', असे देशदिपक यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details