शिमला -संपूर्ण देश सध्या कोरोना विषाणूविरुद्ध लढत आहे. या युद्धामध्ये पोलीस कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी यांची भूमिका मोठी आहे. या लढाईत आयुष्यासह त्यांच्या भावनाही पणाला लागली आहे. आपल्या नवजात मुलाच्या मृत्यूनंतर, पोलीस कोरोनायोद्धाला लगेच लढाईसाठी परत जावे लागले आहे.
हेही वाचा-तेलंगणात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन राहणार, मुख्यमंत्री के. आर राव
धैर्य आणि त्यागाची परीक्षा कदाचितच कुणी देऊ शकेल. परंतु, नाहन येथे पोलीस विभागात कार्यरत असलेले अर्जुन चौहान यांचे नवजात मुलं जन्मताच वारले. मुलावर अत्यसंस्कार करुन अर्जून ताबडतोब कर्तव्यावर परत गेले. याची माहिती मिळताच एसपी सिरमौर अजय कृष्णा शर्मा यांनी त्यांना परत घरी जाण्यास सांगितले.
नाहन येथील मुख्य चौकात अर्जुन ट्रॅफिक पोलीस म्हणून काम करतात. दरम्यान, त्यांची पत्नी गर्भवती होती. गुरुवारी नाहन मेडिकल कॉलेजमध्ये त्यांना मुलगा झाला. मात्र, मुलगा वाचू शकला नाही. जन्मताच त्याचा मृत्यू झाला.
अर्जुन हे रस्त्यावर पोलीसाचे काम करतात. त्यामुळे कारोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून त्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन दुरुनच आपल्या पत्नाला पाहीले. शुक्रवारी त्यांच्या मुलावर अत्यसंस्कार करण्यात आले. हा विधी उरकल्यानंतर लगेच देशावरील कोरोनाचे संकट ओळखून अर्जून कर्तव्यावर गेले. मात्र, एसपी सिरमौर अजय कृष्णा शर्मा यांनी परिस्थिती पाहता अर्जून यांना घरी जाण्यास सांगितले.