नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या बदायू शहरातील एका दाम्पत्याच्या पोटी सयामी जुळ्या मुलींचा जन्म झाला. त्यांची शरीरे एकमेकींना जोडलेली होती. त्यांचे गुदद्वार, गर्भाशय, पाठीचा कणा एकच होते. अशा मुलींवर एम्सच्या डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे.
24 तासांच्या शस्त्रक्रियेनंतर सयामी जुळ्यांना करण्यात आले वेगळे; एम्सच्या डॉक्टरांची कमाल - एम्स सयामी जुळे शस्त्रक्रिया
उत्तर प्रदेशच्या बदायू शहरातील जुळ्या मुलींची शरीरे एकमेकांना जोडलेली होती. या मुलींवर एम्सच्या डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. एम्सच्या बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. मीनू वाजपेयी यांनी 64 आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवली आहे.
एम्सच्या बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. मीनू वाजपेयी यांनी 64 आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवली आहे. 24 तास चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर मुलींना एकमेकींपासून वेगळे करण्यात आले. या मुलींची प्रकृती स्थिर असून त्यांना देखरेखी खाली ठेवण्यात आले आहे. बालरोग विभाग, कार्डियोलॉजी, कार्डियो थेरमोसिक, न्यूरो सर्जरी, प्लास्टिक सर्जरी आणि भुलतज्ज्ञ विभाग या 6 विभागांचे प्रमुख या मुलींची देखभाल करीत आहेत.
या मुलींचे गर्भाशय, पाठीचा कणा, गुदद्वार एकच होते. दोघींच्या ह्रदयाला छिद्रेही होती त्यामुळे ही शस्त्रक्रिया गुंतागुंतीची होती. दोघींचे गर्भाशय वेगळे करून पुन्हा बसवण्यात आले तसेच पाठीच्या कण्याबाबतही तसेच करण्यात आले, असे शस्त्रक्रियेच्या प्रमुख डॉ. मिनू वाजपेयी यांनी सांगितले. एम्सने दुसऱ्यांदा अशा प्रकारची शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवली आहे.