जयपुर (राजस्थान) -राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर आज (मंगळवारी) पुन्हा सकाळी दहा वाजता काँग्रेस आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी काल (सोमवारी) रात्री माध्यमांना ही माहिती दिली. पक्षाचे वरिष्ठ नेता अविनाश पांडे, अजय माकन यावेळी उपस्थित होते.
यावेळी सुरजेवाला म्हणाले, मंगळवारी पुन्हा पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. ही बैठक हॉटेल फेयरमाउंट येथे होईल. या बैठकीला मुख्यमंत्री अशोक गेहलोत, उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासह सर्व आमदार आणि मंत्री यांना बोलावण्यात येईल. त्यांना फोनद्वारे किंवा लिखित सुचना पाठवून बोलावण्यात येईल.
तर राज्यातील काँग्रेस आमदारांनी अनेक समर्थक आमदारांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र पाठवून समर्थन दिले आहे, अशी माहितीही सुरजेवाला यांनी दिली. तर सोमवारी जे आमदार बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांनी मंगळवारी होणाऱ्या बैठकीसाठी उपस्थित रहावे. तसेच जे आमदार दिल्ली किंवा मानेसर येथील हॉटेल येथे उपस्थित आहेत मग त्यात उपमुख्यमंत्री सचिन पायलट असोत किंवा अन्य त्यांनी सकाळी 10 वाजता होणाऱ्या बैठकीसाठी उपस्थित रहावे. तसेच राज्यसरकारवर कोणतेही राजकीय संकट नाही, असा दावा त्यांनी यावेळी केला.
हेही वाचा -राजस्थानमधील राजकीय गोंधळ; बैठकीसाठी काँग्रेसकडून 'व्हीप' जारी