महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

काँग्रेस कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री चौहान यांना 'आय-ड्रॉप्स' आणि 'च्यवनप्राश' दिले भेट

मंगळवारी माजी केंद्रीय मंत्री पचौरी आणि राज्य मंत्री पी. सी. शर्मा आणि इतर काँग्रेस नेत्यांनी दोन वाहनांवरून कर्जमाफीच्या कागदपत्रांचे गठ्ठे चौहान यांच्याकडे पोहोचवले होते. त्यानंतर ते गठ्ठे डोक्यावर उचलून घेऊन ते चौहान यांच्या घरात गेले होते. तेथे त्यांनी या कागदपत्रांच्या गठ्ठ्यांचे ढीग रचले होते.

काँग्रेस कार्यकर्त्यांची भेट

By

Published : May 8, 2019, 8:03 PM IST

भोपाळ - मध्य प्रदेशातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना आय-ड्रॉप्स, बदाम आणि च्यवनप्राश पाठवला आहे. यामुळे त्यांची कमजोर झालेली दृष्टी आणि कमी झालेली स्मरणशक्ती पूर्ववत होईल, असा टोला चौहान यांना लगावण्यात आला आहे.

'शिवराज शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि राज्य सरकारच्या इतर निर्णयांविषयी खोटे बोलत आहेत. आम्हाला त्यांना वास्तवाची जाणीव करून द्यायची आहे. यासाठी आम्ही त्यांना आय ड्रॉप्स आणि च्यवनप्राश दिले आहेत. त्यांची कमजोर झालेली दृष्टी आणि कमी झालेली स्मरणशक्ती पूर्ववत होईल आणि ते बरे होतील,' असे काँग्रेस कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये राज्यात सत्ता आल्यानंतर काँग्रेसने २१ लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी केली. याचा पुरावा म्हणून काँग्रेसचे कार्यकर्ते सुरेश पचौरी यांनी चौहान यांच्या निवासस्थानावर याची कागदपत्रे पोहोचवली. मात्र, शिवराज यांनी हा सर्व खोटारडेपणा असल्याचे म्हटले होते. 'उलट काँग्रेस आल्यापासून राज्यातील वीज गायब झाली आहे,' असा आरोप त्यांनी केला. याशिवाय, 'दिग्विजय सिंह काळोखाचे साम्राज्य परत आणण्यासाठी परत आणण्यासाठी येत आहेत,' असा टोलाही चौहान यांनी लगावला.

मंगळवारी माजी केंद्रीय मंत्री पचौरी आणि राज्य मंत्री पी. सी. शर्मा आणि इतर काँग्रेस नेत्यांनी दोन वाहनांवरून कर्जमाफीच्या कागदपत्रांचे गठ्ठे चौहान यांच्याकडे पोहोचवले होते. त्यानंतर ते गठ्ठे डोक्यावर उचलून घेऊन ते चौहान यांच्या घरात गेले होते. तेथे त्यांनी या कागदपत्रांच्या गठ्ठ्यांचे ढीग रचले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details