नवी दिल्ली -काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात तीव्र निषेध नोंदवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सीएए हा देशाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा मुद्दा असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत.
'संसदेच्या हिवाळी अधिवेशनात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात तीव्र निषेध नोंदवणार' - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी
सोनिया गांधी म्हणाल्या, "सीएए हा एक भेदभाव करणारा देशात फूट पाडणारा कायदा आहे. देशभक्त, सहिष्णु आणि धर्मनिरपेक्ष भारतीयांना धार्मिकतेच्या आधारावर विभाजित करणे हा या कायद्याचा भयावह हेतू आहे"
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी
हेही वाचा -'सीएए-एनआरसी मागे घ्या' पंतप्रधान मोदींकडे ममता बॅनर्जी यांची मागणी
सोनिया गांधी म्हणाल्या, "सीएए हा एक भेदभाव करणारा देशात फूट पाडणारा कायदा आहे. देशभक्त, सहिष्णु आणि धर्मनिरपेक्ष भारतीयांना धार्मिकतेच्या आधारावर विभाजित करणे हा या कायद्याचा भयावह हेतू आहे" समानतेसाठी आणि न्यायासाठी लाखो काँग्रेस कार्याकर्ते या कायद्याविरोधात भारतीय जनतेसोबत खंबीरपणे उभे राहतील असेही त्या यावेळी म्हणाल्या.