नवी दिल्ली - लॉकडाऊनमुळे देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे इतर राज्यात अडकलेले स्थलांतरीत मजूर, कामगार, पर्यटक आणि विद्यार्थ्यांना माघारी नेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे काँग्रेसकडून स्वागत करण्यात आले आहे. फक्तत बसेस पुरणार नाहीत. सर्वांना निर्जंतुकीकरण केलेल्या रेल्वेने राज्यात पोहचावे, असे काँग्रेस नेते पी. चिंदबरम यांनी म्हटले आहे.
'लॉकडाऊनमध्ये अडकलेल्यांना निर्जंतुकीकरण केलेल्या रेल्वेने त्यांच्या राज्यात पोहचावे' - काँग्रेस
इतर राज्यात अडकलेले स्थलांतरीत मजूर, कामगार, पर्यटक आणि विद्यार्थ्यांना माघारी नेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे काँग्रेसकडून स्वागत करण्यात आले आहे.
!['लॉकडाऊनमध्ये अडकलेल्यांना निर्जंतुकीकरण केलेल्या रेल्वेने त्यांच्या राज्यात पोहचावे' Congress welcomes MHA order for allowing movement of migrants, students; demands sanitised trains](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6996030-1055-6996030-1588217824936.jpg)
लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या नागरिकांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नेण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. एप्रिलच्या सुरवातीपासून आम्ही ही मागणी करत आहोत. फक्त बसेस पुरणार नाहीत. त्यासाठी निर्जंतुकीकरण केलेल्या रेल्वेचा वापर करावा. यामुळे सर्वांना ठिक-ठिकाणी सोडता येईल, असे टि्वट चिदंबरम यांनी केले आहे.
लॉकडाऊन दुसऱ्यांदा वाढविण्यात आल्याने अनेक मजूरांनी सरकारकडे वाहतूकीची व्यवस्था करण्याची मागणी केली होती. मात्र, जेथे आहात तेथेच राहण्याचे आवाहन सरकारने नागरिकांना केले होते. मात्र, देशातील कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अडकलेल्या नागरिकांना माघारी नेण्यासाठी गृहमंत्रालयाने पावले उचलायला सुरुवात केली आहे. अनेक स्थलांतरीत कामगारांनी पायी हजारो कि.मी चे अंतर कापत घर गाठले आहे. अनेकांचा प्रवास करताना जीवही गेला. सरकारने जर आधीच त्यांच्या प्रवासाची व्यवस्था केली असती तर अनेकांचे नाहक प्राण गेले नसते. हाताचे काम गेल्याने मंजूर आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांचे हाल होत आहेत.