नवी दिल्ली - इंधन दरवाढी विरोधात काँग्रेस पक्ष देशभरात आंदोलन छेडणार असल्याची माहिती काँग्रेसचे सचिव के. सी. वेनूगोपाल यांनी दिली. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठीकत आज( मंगळवार) हा निर्णय घेण्यात आला. सरकारने सलग 17 व्या दिवशीही इंधर दर वाढविल्यामुळे सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे वेणूगोपाल म्हणाले.
इंधन दरवाढी विरोधात काँग्रेस देशभरात आंदोलन छेडणार - काँग्रेस कार्यकारिणी बैठक
वाढत्या इंधन दरवाढीवर चिंता व्यक्त करत काँग्रेस कार्यकारिणीने यावर ठराव पास केला आहे. कोरोना काळात नागरिक आधीच अडचणींचा सामना करत असताना सरकारने त्याच्यावर इंधन दरवाढ थोपवली, असे काँग्रेसने बैठकीत मत व्यक्त केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यासंबधीच्या नियमावलींचे पालन करत आंदोलन कसे करता यईल, यावर आमचा विचार सुरू आहे, असे वेणूगोपाल म्हणाले. वाढत्या इंधन दरवाढीवर चिंता व्यक्त करत काँग्रेस कार्यकारिणीने यावर ठराव पास केला आहे. कोरोना काळात नागरिक आधीच अडचणींचा सामना करत असताना सरकारने त्याच्यावर इंधन दरवाढ थोपवली, असे काँग्रेसने बैठकीत मत व्यक्त केले.
लोकांवर अतिरिक्त दरवाढ थोपवून भाजप नफा कमवत आहे. 2014 सालापासून डिझेलच्या उत्पादन शुल्कात 820 टक्के तर पेट्रोलच्या उत्पादन शुल्कात 258 टक्के वाढ झाली आहे. या दरवाढीचा काँग्रेसने निषेध केला. सरकार नागरिकांची शोषण करत आहे. सरकारने जर ह्या नीतीत बदल केला नाही तर मध्यम वर्ग गरिबीत ढकलला जाईल आणि गरीब जनता नष्ट होईल, असे काँग्रेस कार्यकारिणीने बैठकीत म्हटले.