भोपाळ - काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी सीएएविरोधी आंदोलनादरम्यान पोलीस अत्याचारांचा फटका बसलेल्या मुजफ्फरनगर व मेरठ येथील परिवारांची भेट घेतली. त्यावरून भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी प्रियांका गांधींवर निशाणा साधला. काँग्रेसचा इतिहास पाहिल्यानंतर लक्षात येईल की, काँग्रेसने नेहमीच दंगेखोरांचे आणि आतंकवाद्यांना समर्थन केले आहे, असे साध्वी म्हणाल्या.
काँग्रेस हा दंगेखोरांना समर्थन करणारा पक्ष - साध्वी प्रज्ञा - congress supports terrorists
भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी प्रियांका गांधींवर निशाणा साधला.
साध्वी प्रज्ञा
सीएएविरोधात काँग्रेसने चूकीची माहिती पसरवली आहे. कायद्याचा विरोध करणारी लोक संविधानाचा विरोध करत आहेत. तसेच स्वतंत्रता सेनानींचा अपमान करणं ही काँग्रेसची संस्कृती असल्याचे साध्वी म्हणाल्या.
सीएए आणि एनआरसीविरोधात जनतेमध्ये विरोधकांनी खोटी माहिती पसरवली आहे. ती दूर करण्यासाठी आज पक्षाकडून जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत भाजप नेते घरोघरी जाऊन लोकांना सीएएविषयी माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले.