महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मुलींच्या सुरक्षेच्या बाबतीत भाजप असंवेदनशील; 6 महिन्यांमध्ये 24 हजार मुलींवर अत्याचार - rising

रणदीप सुरजेवाला यांनी मुलींवर वाढत्या अत्याचारांच्या घटनांवरून भाजपवर हल्लाबोल केला आहे.

रणदीप सुरजेवाला

By

Published : Jul 13, 2019, 10:56 PM IST

नवी दिल्ली - रणदीप सुरजेवाला यांनी मुलींवर वाढत्या अत्याचारांच्या घटनांवरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजप सरकारच्या असंवेदनशील आणि उदासीन शासनामुळे सर्वोच्च न्यायलयाला स्वत: या प्रकरणाची दखल घेत सुमोटो याचिका दाखल करावी लागली असल्याचे रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘बेटी बचाव बेटी पढाव' हे अभियान अपयशी ठरल्याचं ते म्हणाले. गेल्या सहा महिन्यांमध्ये 24 हजार मुलींवर लैगिक अत्याचार झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल केली आहे.


1 जानेवारी ते 30 जूनदरम्यान अल्पवयीन मुलींवरील लैगिक अत्याचाराच्या 24 हजार 212 घटना घडल्याचे समोर आले आहे. यामध्ये उत्तर प्रदेशात 3 हजार 457 तक्रारी दाखल करण्यात आल्या असून त्यापैकी 115 तक्रारींवर कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.


महाराष्ट्रात ,कर्नाटक, दिल्ली, गुजरात, तेलंगण, केरळ आणि नागालँडसहित अन्य राज्यांमध्येही अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या असल्याची माहिती आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details