हैदराबाद - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांचे आज पहाटेच्या सुमारास निधन झाले. रेड्डी यांना मागील काही दिवसांपासून न्यूमोनियाचा त्रास होता. यामुळे त्यांच्यावर गच्चीबावली येथील एशिअन गेस्ट्रो एन्टरोलॉजी रुग्णालात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान, रेड्डी यांची प्राणज्योत मालवली.
माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांचे निधन - Jaipal Reddy
काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांचे निधन झाले. रेड्डी यांना मागील काही दिवसांपासून न्यूमोनियाचा त्रास होता. यामुळे त्यांच्यावर गच्चीबावली येथील एशिअन गेस्ट्रो एन्टरोलॉजी रुग्णालात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान, रेड्डी यांची प्राणज्योत मावळली.

माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांचे निधन
माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांचे निधन
जयपाल रेड्डी यांचा जन्म 16 जानेवारी 1942 ला पूर्वीच्या आंध्र प्रदेश आताचा तेलंगणामधील महबूबनगर जिल्ह्यात झाला होता. लोकसभेवर ते तब्बल 5 वेळा निवडून गेले होते. तर दोन वेळा राज्यसभेचे ते सदस्यही होते. इंद्रकुमार गुजराल आणि मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा पदभार सांभाळला होता.
Last Updated : Jul 28, 2019, 7:44 AM IST