महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

काँग्रेसने मोदींना पाठवले संविधान; पेमेंट ऑप्शन 'कॅश ऑन डिलीव्हरी' - काँग्रेस मोदी संविधान

अमेझॉन या ऑनलाईन खरेदी-विक्री करणाऱ्या संकेतस्थळावरून काँग्रेसने मोदींना संविधानाची प्रत पाठवली आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसने या ऑर्डरसाठी पेमेंट ऑप्शन निवडताना 'पे ऑन डिलीव्हरी' हा पर्याय निवडला आहे. म्हणजेच, संविधानाची ही प्रत स्वीकारण्यासाठी पंतप्रधान मोदींना त्याची किंमत द्यावी लागणार आहे.

Congress sends copy of The Constitution to Narendra Modi with payment option as Pay on Delivery
काँग्रेसने मोदींना पाठवले संविधान; पेमेंट ऑप्शन 'कॅश ऑन डिलीव्हरी'

By

Published : Jan 27, 2020, 10:58 AM IST

नवी दिल्ली -काँग्रेस पक्षाने प्रजासत्ताक दिनाच्या मूहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना संविधानाची प्रत पाठवली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून काँग्रेसने या ऑर्डरचा 'स्क्रीनशॉट' पोस्ट केला आहे. यासोबत 'संविधान हे आपणापर्यंत लवकरच पोहोचेल. देशाचे विभाजन करण्यापासून जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, तेव्हा तुम्ही ते नक्की वाचा' असा खोचक संदेशही या ट्विटमध्ये काँग्रेसने मोदींसाठी दिला आहे.

अमेझॉन या ऑनलाईन खरेदी-विक्री करणाऱ्या संकेतस्थळावरून काँग्रेसने मोदींना संविधानाची प्रत पाठवली आहे. ऑनलाईन पाठवलेली ही प्रत अंदाजे २६ जानेवारीला पंतप्रधानांच्या कार्यालयात पोहोचेल, असे या स्क्रीनशॉटमध्ये दिसून येत आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसने या ऑर्डरसाठी पेमेंट ऑप्शन निवडताना 'पे ऑन डिलीव्हरी' हा पर्याय निवडला आहे. म्हणजेच, संविधानाची ही प्रत स्वीकारण्यासाठी पंतप्रधान मोदींना त्याची किंमत द्यावी लागणार आहे.

त्यामुळे आता, मोदींपर्यंत हे संविधान पोहोचले असेल का? आणि पोहोचले असल्यास, त्यांनी पैसे चुकते करून ते घेतले असेल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

हेही वाचा : 'आदिवासी हे देशातील मूळ रहिवासी, संयुक्त राष्ट्रांकडून त्यांचा स्थानिकत्वाचा पुरावा मिळावा'

ABOUT THE AUTHOR

...view details