महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

काँग्रेसचे ऑस्कर पुरस्कार जाहीर : अ‌ॅक्शनमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार नरेंद्र मोदींना - Modi best Actor

सिनेजगतातील मानाचा पुरस्कार असलेला ऑस्कर पुरस्कार जाहीर झाला आहे. यावर काँग्रेसने देखील वेग-वेगळ्या श्रेणीमधील राजकारणातील व्यक्तींवर आपला ऑस्कर पुरस्कार जाहीर केला आहे.

काँग्रेसने जाहीर केला ऑस्कर पुरस्कार
काँग्रेसने जाहीर केला ऑस्कर पुरस्कार

By

Published : Feb 10, 2020, 4:51 PM IST

नवी दिल्ली - सिनेजगतातील मानाचा पुरस्कार असलेला ऑस्कर पुरस्कार जाहीर झाला आहे. यावर काँग्रेसने देखील वेग-वेगळ्या श्रेणीमधील राजकारणातील व्यक्तींवर आपला ऑस्कर पुरस्कार जाहीर केला आहे. अॅक्शनमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर केला. काँग्रेसने या पुरस्काराचा व्हिडिओ देखील टि्वटरवर शेअर केला आहे.

काँग्रेसने खलनायक भूमिकेचा पुरस्कार अमित शाह यांना जाहीर केला आहे. गब्बर सिंह आणि मोगँबो हे जुणे खलनायक होते. आता नव्या भारताचे नवे खलनायक आहेत, असे टि्वट काँग्रेसने केले आहे. तसेच कॉमेडीमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार भाजप नेता मनोज तिवारी यांना दिला आहे. व्हिडिओमध्ये मनोज तिवारी योगा करताना पाहायला मिळत आहेत.
तसेच नाटक करण्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिला आहे. काँग्रेसने शेअर केलेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावर वेग-वेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details