महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'गेल्या 6 वर्षांमध्ये 9 दशलक्ष नोकऱ्यांचे नुकसान' ,सोनिया गांधींचा भाजपवर हल्लाबोल - सोनिया गांधींचा भाजपवर निशाणा

गेल्या 6 वर्षांमध्ये 9 दशलक्ष नोकऱ्यांचे नुकसान केले असल्याचं आरोप काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सरकारवर केला आहे

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी

By

Published : Nov 2, 2019, 8:47 PM IST

नवी दिल्ली - गेल्या 6 वर्षांमध्ये 9 दशलक्ष नोकऱ्यांचे नुकसान केले असल्याचं आरोप काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सरकारवर केला आहे. याचबरोबर व्हॉट्सअॅप हेरगिरी प्रकरणावरून नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला.


पहिल्या तिमाहीत जीडीपीची वाढ केवळ 5 टक्के एवढी झाली असून ही चिंतेची बाब आहे. रोजगाराची पातळी 8.5 टक्क्यांवर पोहोचली आहे. नोटाबंदी, जीएसटी आणि त्यानंतरच्या मोदी सरकारच्या आर्थिक निर्णयांमुळे गेल्या 6 वर्षांमध्ये तब्बल 9 दशलक्ष नोकऱ्या देशाने गमावल्या असल्याचं अभ्यासातून समोर आले असल्याचं त्या म्हणल्या.


पत्रकार, वकील, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारण्यांच्या फोनवर नजर ठेवण्यासाठी भाजप सरकारने इस्रायली कंपनीला कामाला लावले असल्याची माहिती आली आहे. असे करणे केवळ बेकायदेशीर आणि असंवैधानिकच नाही तर अत्यंत लाजीरवाणे आहे, असे सोनिया म्हणाल्या.


यापुर्वी 31 व्या इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार संमेलनात सोनिया गांधींनी भाजपवर हल्लाबोल केला होता. जाती किंवा पंथांच्या आधारे लोकांची विभागणी केली गेली तर देशाची कधीच समृद्धी आणि प्रगती होऊ शकत नाही. देशातील हिंसाचार आणि सहिष्णुतेच्या घटना आपण पाहत आहोत. या परिस्थितीमध्ये अवैज्ञानिक गोष्टींना प्रोत्साहन दिले जात असल्याचं त्या म्हणाल्या होत्या.

काय आहे व्हॉट्सअॅप हेरगिरी प्रकरण?
इस्रायलच्या स्पायवेअर पिगासस भारतामध्ये सक्रिय होता. इस्राईलमधील एनएसओ ग्रुपने तंत्रज्ञानाचा वापर करत जगभरातील १ हजार ४०० लोकांच्या स्मार्टफोनला लक्ष्य केल्याचे व्हॉट्सअॅपने म्हटले आहे. यामध्ये राजकीय विरोधक, पत्रकार आणि सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मात्र, यामध्ये कोणत्या पत्रकार आणि कार्यकर्त्यांचा समावेश हे कंपनीने जाहीर केले नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details