नवी दिल्ली - कोरोना विषाणूविरूद्ध लढ्यात युद्धपातळीवर हातभार लावण्यासाठी शुक्रवारी काँग्रेसने कोरोनाविरोधी रणनीती आखली. काँग्रेस कार्यकारणी समितीच्या नेत्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. संकटाला तोंड देण्यासाठी सर्व राज्यांतील काँग्रेसच्या संघटना आणि कार्यकर्ते कोरोनाविरोधात लढा देतील. तसेच समितीकडून केंद्र सरकाराला काही उपाय सुचवण्यात आले आहे. यावेळी सोनिया गांधी यांनी अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्ते केली.
जगातील बर्याच देशांच्या तुलनेत भारतात कोरोना विषाणूची चाचणी घेण्याचे प्रमाण फार कमी आहे. तपासणीची संख्या वाढवण्याची गरज आहे. प्रत्येक नागरिकाला तपासणीची सुविधा जलद मिळू शकेल, अशी विश्वासार्ह यंत्रणा सुनिश्चित करावी लागेल. आरोग्य कर्मचार्यांना आवश्यक उपकरणे उपलब्ध करून देण्यात यायला हवीत आणि त्यांनाही योग्य आर्थिक सुरक्षा मिळायला हवी, असे सोनिया गांधी यांनी म्हटले.