नवी दिल्ली - राहुल गांधींनी राफेलवरील सर्वोच्च निर्णयाविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली. न्यायालयाने राफेल प्रकरणातील निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील सुनावणी घेण्यास परवानगी दिली होती. यानंतर राहुल गांधींनी 'आता चौकीदारच चोर आहे, हे सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केले आहे,' असे वक्तव्य केले होते.
'चौकीदार चोर है' वक्तव्याबद्दल राहुल गांधींकडून सर्वोच्च न्यायालयाची माफी - regretted
सर्वोच्च न्यायालयाने राहुल यांना नोटीस जारी केली होती. आता राहुल यांनी या वक्तव्याविषयी माफी मागितली आहे. तसेच, न्यायालयाने असे शब्द वापरले नव्हते, असेही त्यांनी म्हटले आहे.
न्यायालयाने राफेलविषयी विविध गोपनीय कागदपत्रे बाहेर आली असली, तरी त्याचा ही कागदपत्रे पुरावा म्हणून वापरण्यात गोपनीयतेचा मुद्दा आड येऊ शकत नाही, असा निर्णय दिला होता. यानंतर राहुल गांधींनी 'आता चौकीदारच चोर आहे, हे सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केले आहे,' असे वक्तव्य केले होते. न्यायालयाने असे म्हटलेच नसून यामुळे विनाकारण मोदींची बदनामी केली जात आहे, अशी तक्रार भाजपतर्फे करण्यात आली होती. यानंतर भाजपच्या मीनाक्षी लेखी यांनी राहुल गांधींच्या विरोधात याचिका दाखल केली होती. यात राहुल गांधी प्रसारमाध्यमे आणि जनतेची दिशाभूल करत असल्याचा आणि चुकीची माहिती देत असल्याचा आरोप करण्यात आला होता.
यानंतर सर्वोच्च न्यायालयाने राहुल यांना नोटीस जारी केली होती. आता राहुल यांनी या वक्तव्याविषयी माफी मागितली आहे. तसेच, न्यायालयाने असे शब्द वापरले नव्हते, असेही त्यांनी म्हटले आहे.