लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधातली आंदोलनात अटक झालेल्या निवृत्त पोलीस अधीक्षकाच्या कुटुंबीयाची प्रियंका गांधी यांनी भेट घेतली. यावेळी स्कुटीवरून विनाहेल्मेट प्रवास केल्यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांनी स्कुटी चालकाला 6 हजार 100 रुपयांचा दंड ठोठावला आहे.
कायद्याविरोधातील आंदोलनात हिंसा केल्याप्रकरणी निवृत्त पोलीस निरीक्षक एस.आर. दारापुरी यांना अटक करण्यात आली आहे. दारपुरी यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी प्रियंका गांधी जात होत्या. यावेळी प्रियांका गांधी यांच्या गाडीने अचानक वाहतूक मार्गात बदल केल्यामुळे पोलिसांनी त्यांना रोखले. वादविवादानंतर प्रियंका गांधी काँग्रेस कार्यकर्ता धीरज गुर्जर यांच्या स्कुटीवर बसून दारापूरी यांच्या घरी गेल्या. त्यावेळी हेल्मेट न घातल्यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांनी धीरज गुर्जर 6 हजार 100 एवढे चालान फाडले आहे.
हेही वाचा -'उत्तर प्रदेश सरकारने अमानुषतेच्या सर्व सीमा पार केल्या', प्रियांका गांधींचे टि्वट
चालक परवानासाठी (ड्रायव्हिंग लायसन्स) 2 हजार 500 रुपये, विनाहेल्मेट प्रवासासाठी 500 रुपये, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे 300 रुपये, खराब नंबर प्लेटसाठी 300 रुपये, आणि चुकीच्या पद्धतीने गाडी चालवल्यामुळे 2 हजार 500 रुपये, असा दंड ठोठावला आहे.
हेही वाचा -'केंद्रीय राखीव पोलीस दल हे जगातील सर्वांत धाडसी सशस्त्र बल'