भोपाळ - काँग्रेसला लवकरच आपला नवा अध्यक्ष शोधावा लागणार आहे. पक्षामध्ये उर्जा निर्माण करु शकेल अशा उर्जावान व्यक्तीला कॉंग्रेसने अध्यक्षपदाची संधी दिली पाहिजे, असे मत काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी गुरवारी व्यक्त केले.
'अध्यक्ष असा हवा जो पक्षामध्ये उर्जा निर्माण करू शकेल' - leadership
पक्षामध्ये उर्जा निर्माण करु शकेल अशा उर्जावान व्यक्तीला कॉंग्रेस अध्यक्षपदाची संधी दिली पाहिजे असे मत काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी गुरवारी व्यक्त केले आहे.
'पक्षासमोर सध्या अध्यक्ष निवडण्याची मोठी समस्या आहे. राहुल यांना मनवण्याचा खुप प्रयत्न केला आहे. मात्र ते आपल्या निर्णयावर ठाम आहेत. पक्षाने जास्त वेळ न दवडता अध्यक्ष निवडायला हवा, पक्षामध्ये उर्जा निर्माण करु शकेल अशा उर्जावान व्यक्तीला कॉंग्रेस अध्यक्षपदाची संधी दिली जावी', असे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटले.
ज्यानी केवळ काँग्रेसच नव्हे तर देशाच्या जनतेचे नेतृत्व केले होते, ते आपले पद सोडतील अशी आम्ही कल्पना केली नव्हती, असे ही त्यांनी म्हटले.
तुम्ही अध्यक्ष व्हाल का? या प्रश्नाच्या उत्तरार्धात सिंधिया यांनी पत्रकारांना सांगितले की, 'मी मध्यप्रदेशमधला होतो, आहे, आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मध्यप्रदेशमध्ये राहणार आहे. माझी धाव ही सत्तेसाठी नसून लोकांची सेवा करण्यासाठी आहे'. दरम्यान काही दिवसांपुर्वी ज्योतिरादित्य सिंधिया यांनाच काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बसवा, अशी मागणी करणारे पोस्टर्स मध्यप्रदेशात लागले होते.