नवी दिल्ली - काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली खासदारांची बैठक बुधवारी पार पडली आहे. या बैठकीदरम्यान, राहुल गांधी आपल्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ठाम असल्याचे पाहायला मिळाले आहे. या बैठकीत आपण काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहणार नसल्याचे त्यांनी खासदारांना सांगितले आहे.
खासदारांना राहुल गांधींची मनधारणी करण्यात अपयश; म्हणाले मला अध्यक्षपद नकोच!
राहुल गांधी आपल्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ठाम असल्याचे पाहायला मिळाले आहे. या बैठकीत आपण काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहणार नसल्याचे त्यांनी खासदारांना सांगितले आहे.
लोकसभा निवडणुकांचा पराभव काँग्रेसच्या अतिशय जिव्हारी लागणाऱ्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यावेळी लोकसभा निवडणुकीमधील पराभव हा फक्त राहुल गांधी यांची जबाबदारी नसून ती सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे राहुल यांनी अध्यक्षपदी कायम रहावे, आशी विनंती खासदारांनी केली होती. मात्र राहुल गांधी आपल्या राजीनाम्यावर ठाम आहेत.
याचबरोबर कार्यर्त्यांनी राहुल गांधी यांचा मन वळवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे. राहुल गांधी यांच्या दिल्लीमधील घरासमोर कार्येकर्ते निदर्शेन करत आहेत. "राहुल गांधी जिंदाबाद! राहुल गांधी संघर्ष करो हम तुम्हारे साथ है ! हमारा नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो ! असे नारे तरुणांनी लगावले आहेत. राजीनामा मागे घेऊन पक्षाचे अध्यक्षपद सांभाळण्याची विनंती केली आहे.