महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटेना, काँग्रेसचे आमदार हलवले राजस्थानात - भाजप शिवसेना युती

आमदारांची फोडाफोडी होऊ नये म्हणुन काँग्रेसचे आमदार राजस्थानातील जयपूर येथे गेले आहेत. काल(शुक्रवारी) रात्री ९.३०  वाजता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आमदार ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत तेथे त्यांची भेट घेतली.

काँग्रेस आमदार हलवले राजस्थानात

By

Published : Nov 9, 2019, 8:26 AM IST

जयपूर- महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा अजूनही सुटलेला नाही. भाजप शिवसेना युतीत मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान, आमदारांची फोडाफोडी होऊ नये म्हणुन काँग्रेसचे आमदार राजस्थानातील जयपूर येथे आश्रयाला गेले आहेत. काल (शुक्रवारी) रात्री ९.३० वाजता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आमदार ज्या रिसॉर्टमध्ये थांबले आहेत तेथे त्यांची भेट घेतली.

काँग्रेस आमदार हलवले राजस्थानात

आज शनिवारी ११.३० वाजता मुख्यमंत्री अशोक गेहलोत पत्रकार परिषद घेणार आहेत. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आज जयपूरला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने तेथे आमदार सुरक्षित राहतील म्हणून त्यांना राजस्थानमध्ये आणण्यात आल्याचे बोलले जात आहे. राजस्थानामधील जयपूर येथील एका रिसॉर्टमध्ये हे सर्व आमदार थांबले असल्याची माहिती मिळत आहे. सुमारे १२ काँग्रेसचे आमदार तेथे असल्याची माहिती मिळत आहे. आणखी आमदारही लवकरच राजस्थानात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

राजस्थानचे प्रभारी महासचिव अविनाश पांडे सर्व आमदारांना घेण्यासाठी जयपूरला आले होते. अविनाश पांडे यांची महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये महत्त्वाची भुमिका होती. अविनाश पांडे हे महाराष्ट्रातील नागपूरचे असून सध्या ते राजस्थान काँग्रेसच्या प्रभारी महासचिवपदी आहेत. याआधी कर्नाटकमध्ये कुमारस्वामी सरकार अडचणी सापडले होते तेव्हा आमदार राजस्थानातील माऊंट अबू येथे आणण्यात आले होते. तेव्हाही राजस्थान चर्चेत आले आहे. आता महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा घोळ राजस्थानात पोहचला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details