महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'भाजप सूडाचे राजकारण करत आहे'; 'एसपीजी' प्रकरणावरून काँग्रेस नेत्यांची टीका..

गांधी परिवाराची एसपीजी सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय आज घेण्यात आला. त्यानंतर देशभरातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. या निर्णयाविरोधात देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहेत. भाजपन वैयक्तिक पातळीवर सूडाचे राजकारण करत असल्याची टीका काँग्रेस नेते करत आहेत.

By

Published : Nov 8, 2019, 7:48 PM IST

Congress SPG security

नवी दिल्ली -गांधी परिवाराची एसपीजी सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय आज घेण्यात आला. त्यानंतर देशभरातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. या निर्णयाविरोधात देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहेत. भाजपन वैयक्तिक पातळीवर सूडाचे राजकारण करत असल्याची टीका काँग्रेस नेते करत आहेत.

काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी याबाबत ट्विट करत म्हटले आहे, की भाजप सध्या वैयक्तिक पातळीवर सूडाचे राजकारण करत आहे. दहशतवाद आणि हिंसाचारापुढे दोन माजी पंतप्रधानांच्या कुटुंबीयांच्या आयुष्याशी भाजप तडजोड करत आहे.

तर, काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनीदेखील, 'पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे सूडाने आंधळे झाले आहेत. अचानकपणे गांधी कुटुंबाची एसपीजी सुरक्षा काढून घेण्याच्या निर्णयाने हे सिद्ध होते आहे.' असे म्हणत आपली नाराजी व्यक्त केली आहे. ते पुढे म्हणाले, की 'अटल बिहारी वाजपेयींनी गांधी कुटुंबाला सुरक्षा देण्याच्या कायद्यात सुधारणा केली होती. मोदी आणि शाहांनी मात्र आता त्यात बदल केला आहे.'
देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना एसपीजी सुरक्षा व्यवस्था देण्यात येते. त्यामध्ये आतापर्यंत गांधी कुटुंबीयांचाही समावेश होता. मात्र, त्यांची एसपीजी सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे. एसपीजी सुरक्षा व्यवस्था काढून घेतल्यानंतर त्याजागी सीआरपीएफ जवान असलेली झेडप्लस सुरक्षा व्यवस्था देण्यात येईल. तसेच, आता केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच एसपीजी सुरक्षा असणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details