नवी दिल्ली -देशाच्या आर्थिक स्थितीच्या दृष्टीने एक चिंतेची बातमी आहे. नव्याने जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न ४.५ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. जीडीपी दरात झालेल्या घसरणीबद्दल मोदी सरकारवर काँग्रेसने टि्वटरवरून निशाणा साधला आहे.
जीडीपी घसरण मुद्द्यांवरून काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल - Gross Domestic Product
नव्याने जाहीर झालेली आकडेवारीनुसार भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न ४.५ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.
जीडीपी घसरण मुद्द्यांवरून काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल
भारताच्या जीडीपीमध्ये ४.५ पर्यंत घसरण झाली आहे. मात्र भाजप दिवसेंदिवस नैतीकता आणि प्रशासनामध्ये खालच्या पातळीवर येण्याचा रेकार्ड बनवत आहे, असे काँग्रेसने टि्वटमध्ये म्हटले आहे.
रिजर्व बँक ऑफ इंडियांने २०१९-२० साली जीडीपी ६.१ टक्क्यावर राहणार असल्याचे भाकित केले होते. त्याआधी विकास दर ६.९ टक्के राहणार असल्याचे सर्वोच्च बँकेने म्हटले होते. मात्र, नंतर आकडेवारीत बदल केला होता. आता विकास दर ४.५ टक्क्यांवर आल्याने सर्वांना धक्का बसला आहे.