म्हैसूर - सध्या कर्नाटकात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हैसूर विमानतळावर त्यांच्याच कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली आहे. मात्र, या मागचे कारण अद्याप स्पष्ट नाही.
यापुर्वी सिद्धरामय्या यांचा म्हैसूरमध्ये एका कार्यक्रमात महिलेला धमकावत तीच्याशी गैरवर्तन केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावर सिद्धरामय्या यांनी संबधीत महिला आपल्याला बहिणीसारखी असल्याचे सांगत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तर महिलेने स्वत:ची चूक असल्याचे सांगितले होते.