नवी दिल्ली -काँग्रेस नेते आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव त्यागी(५०) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज(बुधवार) निधन झाले. त्यागी यांची प्रकृती उत्तम होती. त्यांना कोणताही त्रास नव्हता. मात्र, आज हृदयविकाराचा झटका आला, त्यातच त्यांचे निधन झाले. राजीव त्यागी माध्यमांमधील एक प्रमुख चेहरा होते. अनेक कार्यक्रमांमध्ये ते सहभाग घेत असत. नुकतेच एका टीव्ही चर्चासत्रात त्यांनी सहभाग घेतला होता.
'राजीव त्यागी यांच्या निधनाने काँग्रेसचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. ते एका विचारधारेने प्रेरित होते. त्यांच्या कुटुंबियांप्रती सद्भावना, असे ट्विट काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केले आहे.