तिरुवनंतपुरम - केरळात मुसळधार पावसाचा कहर सुरूच आहे. माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज केरळला गेले असून मतदारक्षेत्र वायनाडला भेट दिली आहे. वायनाडला पुराचा सर्वात जास्त फटका बसला आहे.
वायनाडचा दौरा करणार असल्याची माहिती राहुल गांधींनी टि्वटरवरून दिली होती. 'पुढचे काही दिवस मी माझ्या लोकसभा मतदार संघ, वायनाड येथे राहणार आहे. यादरम्यान मी वायनाडमधील मदत-शिबिरांना भेट देईन. जिल्हा व राज्य अधिकाऱ्यांसमवेत वायनाडमधील स्थितीचा आढावा घेईन', असे राहुल यांनी टि्वट करून म्हटले.