महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर ट्विटास्त्र, कोरोना काळात सरकारने मिळवले 'हे' यश - राहुल गांधी नरेंद्र मोदी बातमी

देशातील कोरोना काळात मोदी सरकारने केलेल्या कामगिरीचा उपहासात्मक आढावा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे घेतला आहे.

congress leader rahul gandhi on pm modi
राहुल गांधी

By

Published : Jul 21, 2020, 10:15 AM IST

नवी दिल्ली -काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशातील कोरोना रुग्ण वाढीवरुन पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी कोरोना संसंर्ग काळात मोदी सरकारने वैद्यकीय सेवेकडे दुर्लक्ष करुन राजकारणावर लक्ष केंद्रीत केल्याचे संपूर्ण देशाने पाहिले आहे. तसेच या काळात मोदी सरकारने पुढिल दैदिप्यमान यश मिळवल्याचा टोलाही त्यांनी लगावला असून त्याची महिन्याप्रमाणे यादी तयार केली आहे.

कोरोना काळात सरकारने मिळविलेले यश

● फेब्रुवारी- नमस्ते ट्रंप कार्यक्रम यशस्वी

● मार्च - मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकार पाडले

● एप्रिल - मेणबत्ती पेटविणेसारखा इव्हेंट यशस्वी

● मे - मोदी सरकारचे ६ वर्ष पूर्ण कार्यक्रम

● जून - बिहारमध्ये व्हर्च्युअल रॅली

● जुलै - राजस्थान सरकार पाडण्यात मग्न

या सर्व मोदी सरकारच्या कामामुळे भारत कोरोना विरुद्धच्या लढाईत 'आत्मनिर्भर' आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details