जयशंकरजी पंतप्रधान मोदींनाही मुत्सद्देगिरी शिकवा, राहुल गांधीचा मोदींना टोला - राहुल गांधीचा मोदींना टोला
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. परराष्ट्रमंत्री असे पर्यंत पंतप्रधानाना थोडा मुसद्दीपणा शिकवा, असे एस जयशंकर यांना आवाहन करत मोदींवर टीका केली.
नवी दिल्ली - ह्युस्टनमधील हाऊडी मोदी कार्यक्रमामध्ये 'अब की बार ट्रम्प सरकार' घोषणा दिल्यावरुन मोदींवर टीका होत आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर मात्र मोदींच्या मदतीला धावून गेले आहेत. मोदींच्या वक्तव्याचा चुकीचा अन्वयार्थ काढल्याचे म्हणत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. परराष्ट्रमंत्री असे पर्यंत पंतप्रधानांना थोडा मुत्सद्दीपणा शिकवा, असे म्हणत त्यांनी मोदींवर टीका केली.