नवी दिल्ली- देशातली अनेक राज्यांत रोजगाराच्या निमित्ताने वास्तव्यास असलेले उत्तर प्रदेशातील कामगार, मजूर लोक सध्या लॉकडाऊनमुळे तिथेच अडकले आहेत. या सर्व मजुरांना त्यांच्या घरी परत पोहोचवणार असल्याचा निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
सर्वांनी मिळून एका दिशेने एकत्र प्रयत्न केले तर कोरोनाला पराभूत करणे अशक्य नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांनीही अडकलेल्या मजुरांना परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते, असे प्रियांका गांधी म्हणाल्या. तसेच मजुरांना परत आणण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल उत्तर प्रदेश सरकारचे त्यांनी आभार मानले.