पीडित विद्यार्थिनीला अटक हाच भाजप सरकारचा न्याय का? प्रियांका गांधीची टीका - priyanka gandhi on chinmayanand case
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या विद्यार्थिनीलाच अटक करण्यात आल्याबद्दल काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी उत्तरप्रदेश सरकारवर टीका केली आहे.
प्रियांका गांधी
नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या विद्यार्थिनीलाच अटक करण्यात आल्याबद्दल काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधींनी उत्तरप्रदेश सरकारवर टीका केली आहे. हाच भाजपचा न्याय आहे का? असा प्रश्न त्यांनी यागी आदित्यानाथ यांना विचारला आहे.