INX मीडिया प्रकरण : अखेर १०६ दिवसानंतर पी. चिदंबरम यांची तिहार तुरुंगातून सुटका - P Chidambaram
आयएनएक्स माध्यम प्रकरणी काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांची तिहार तुरुंगातून सुटका झाली आहे. यावेळी माध्यम प्रतिनीधींनी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी तुरुंगाबाहेर गर्दी केली होती.
पी. चिदंबरम
नवी दिल्ली - आयएनएक्स माध्यमप्रकरणी काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांची तिहार तुरुंगातून सुटका झाली आहे. सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) दाखल केलेल्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे तब्बल १०६ दिवसानंतर चिदंबरम तुरुंगातून बाहेर आले आहेत. यावेळी माध्यम प्रतिनीधींनी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी तुरुंगाबाहेर गर्दी केली होती.
२१ ऑगस्टला सीबीआयने चिदंबम यांना अटक केली होती. त्यावेळी दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला होता. मात्र, त्याचवेळी ईडीनेही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. यावर चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी जामीन दिला होता. मात्र, ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी त्यांना जामीन मिळाला नव्हता. त्यामुळे ते तिहार तुरुंगामध्ये होते. तब्बल १०६ दिवसानंर आता त्यांना जामीन मिळाला आहे. त्यामुळे ते नुकतेच तिहार तुरुंगातून बाहेर आले आहेत.