महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आयएनएक्स मीडिया प्रकरण : पी. चिदंबरम  यांनी तुरुंगात वाचला धार्मिक ग्रंथ

दिल्लीच्या तिहार तुरुंगातील पहिल्या दिवशी चिदंबरम यांनी  धार्मिक ग्रंथ वाचल्याची माहिती आहे.

By

Published : Sep 6, 2019, 4:05 PM IST

पी. चिदंबरम

नवी दिल्ली - माजी अर्थमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी.चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणी १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दिल्लीच्या तिहार तुरुंगातील पहिल्या दिवशी चिदंबरम यांनी धार्मिक ग्रंथ वाचल्याची माहिती आहे.

न्यायालयाच्या निर्णयानंतर चिदंबरम यांची रवानगी दिल्लीच्या तिहार तुरुंगात झाली आहे. चिदंबरम यांना 19 सप्टेंबरपर्यंत तुरूंगात रहावे लागणार आहे. धार्मिक ग्रंथ वाचल्यानंतर त्यांनी सकाळी दलिया, चहा आणि दुधाचा नाष्टा केला. त्यानंतर त्यांना वृतपत्र देण्यात आले.

चिदंबरम यांना तुरुंगामध्ये अनेक सुविधा मिळणार आहेत. त्यामध्ये वेस्टर्न टॉयलेट, झोपण्यासाठी लाकडाचा बाकडे, टीव्ही, पुस्तके ,चश्मा आणि औषधेही पुरवली जाणार आहेत. याचबरोबर चिदंबरम यांना जेवणामध्ये दाळ, पोळी आणि भाजी खायला मिळणार आहे. तसेच त्याच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details