नवी दिल्ली - देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून एप्रिल ते जून या तिमाहीत भारताचा विकास दर हा उणे २३.९ टक्के झाल्याचे ताज्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. देश गंभीर आर्थिक संकटात सापडल्यानंतर विरोधी पक्षांनी पंतप्रधान मोदी तसेच भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या वक्तव्यांची आठवण करून देत चिमटा काढला आहे.
दर तीन महिन्यांनी देशाचा विकास दर जाहीर केला जातो. मागील अनेक वर्षांपासून हा प्रघात पडलेला आहे. आत्तापर्यंतची ही भारताची सर्वात खराब कामगिरी आहे. कोरोना, चिनी अतिक्रमण, कमी होणारी गुंतवणूक यामुळे देशापुढील आर्थिक संकट आणखी गडद होत चालले आहे. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी २० लाख कोटींचे पॅकेजही जाहीर केले आहे. मात्र, तरीही भारताचा विकासदर नकारात्मक झाला आहे. आशियायी देशांमध्ये भारताचा विकास दर सर्वात जास्त खराब आहे.
काय म्हणाले कपिल सिब्बल?