महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या अफवा; जितिन प्रसादांचे स्पष्टीकरण - Modi

जितिन प्रसाद काँग्रेसवर काही कारणास्तव नाराज आहेत. त्यावरून ते काँग्रेसला रामराम ठोकणार, असे वृत्त शुक्रवारी दिवसभर माध्यमांवर चालत होते. त्यानंतर आज प्रसाद यांनी उत्तर देऊन वृत्त फेटाळून लावले.

जितिन प्रसाद

By

Published : Mar 23, 2019, 11:07 AM IST

नवी दिल्ली -काँग्रेसचे मुख्य नेते आणि राहुल गांधींच्या अगदी जवळ असणारे जितिन प्रसाद भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा होती. मात्र, असा कोणताही विचार आपण केलेला नाही. तसेच या बातम्या केवळ अफवा आहेत, असे म्हणून हे वृत्त फेटाळून लावले आहे. शुक्रवारी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेमध्ये याबद्दल स्पष्टीकरण दिले.


जितिन प्रसाद काँग्रेसवर काही कारणास्तव नाराज आहेत. त्यावरून ते काँग्रेसला रामराम ठोकणार, असे वृत्त शुक्रवारी दिवसभर माध्यमांवर चालत होते. त्यानंतर आज प्रसाद यांनी उत्तर देऊन वृत्त फेटाळून लावले. या अफवा आहेत आणि यावर मी काय उत्तर देणार, असे म्हणून त्यांनी आपण काँग्रेस सोडणार नसल्याचे स्पष्ट केले.

जितिन प्रसाद यांच्यावरील बातम्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपाचे वारे सुरू झाले होते. लोकसभा निडवणुकांच्या तोंडावर काँग्रेसला मोठा फटका बसणार अशी चर्चा रंगली होती. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी ट्विट करून प्रसाद यांनी समोर येऊन या बातम्याचे खंडन करण्याचा सल्ला दिला होता. तसेच सर्वच प्रसार माध्यमं अशी बातमी चालवत असल्यामुळे यात तथ्य असल्याचेही म्हटले होते.

शुक्रवारी सायंकाळी काँग्रेसने पत्रकार परिषदेमध्ये या प्रकारची शक्यता फेटाळून लावली होती. उत्तर प्रदेश येथील धौरहरा लोकसभा मतदार संघातून २००९मध्ये जितिन प्रसाद काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र, २०१४ मध्ये ते ही निवडणूक हरले. यावेळी काँग्रेसने परत त्यांना धरौहरा येथून उमेदवारी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details