अहमदाबाद - काँग्रेस नेता हार्दिक पटेल याच्या कानशिलात एकाने लगावली. गुजराच्या सुरेंद्रनगरमध्ये आयोजित एका सभेमध्ये हा प्रकार घडला. कानशिलात लगावणाऱ्या व्यक्तीचे नाव तरुण गज्जर असे आहे.
युवा नेता हार्दिक पटेलच्या कानशिलात लगावली हार्दिक पटेल हे जन आक्रोश सभेला संबोधित करत होते. या दरम्यान तरुण गजर याने अचानक व्यासपीठावर येऊन त्याने हार्दिक पटेलच्या कानशिलात लगावली. या घटनेनंतर सभेच्या ठीकाणी गोंधळ निर्माण झाला. हार्दिक पटेलच्या समर्थकांनी तरुण गजरला मारहाण केली. हार्दिक पटेल याने या प्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यात केली आहे.
मारहाण करणाऱ्या तरुण गज्जर याने पाटीदार आरक्षण आंदोलनामध्ये १४ युवकांच्या झालेल्या मृत्यूस हार्दिक पटेल जबाबदार धरले. तसेच हार्दिक पटेलने काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याच्या विरोधात तरुण ओरडत होता. तरुण गज्जर हा गुजरातच्या महेसाणा जिल्ह्यातील कड़ी तालुकामधील जेसलपुर येथील रहिवासी आहे.
हार्दिक पटेलने या घटनेला भाजप जबाबदार धरले आहे. ते म्हणाले, 'भाजप माझ्यावर हल्ला करत आहे. मला संपवण्याचा त्यांचा हेतू आहे. पण हल्ले झाले तरी आम्ही गप्प बसणार नाही.