भोपाळ -आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह पुन्हा एकदा आपल्या टि्वटमुळे घेरले गेले आहेत. त्यांनी अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन मोहरमच्या मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे ते सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होत आहे. अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देत सिंह यांच्यावर निशाणा साधला आहे.
दिग्विजय सिंहांकडून मोहरमनिमित्त मुस्लिम बांधवाना शुभेच्छा, सोशल मीडियावर झाले ट्रोल - सोशल मीडियावर झाले ट्रोल
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह पुन्हा एकदा आपल्या टि्वटमुळे घेरले गेले आहेत.
मोहरमच्या शुभ मुहूर्तावर सर्व मुस्लिम बांधवांना माझा सलाम असे टि्वट दिग्विजय सिंह यांनी केले आहे. यावर नेटेकऱ्यांनी मोहरम हा मुस्लीम बांधवांसाठी आनंदाचा नाही तर दुःख देणारा असल्याची आठवण सिंह यांना करून दिली.
सातवे शतकामध्ये करबला युद्धात इमा हुसैन आणि त्यांच्या मुलांना ठार करण्यात आले होते. त्यांच्या आठवणीमध्ये मुस्लिम बांधव हा दिवस साजरा करतात. या दिवशी शुभेच्छा दिल्या जात नसून शोक व्यक्त केला जातो. या दिवसाला रोज-ए-आशुराही म्हटले जाते. सिंह यांनी मोहरमच्या शुभेच्छा दिल्याने ते सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले आहेत.