लखनऊ (उत्तर प्रदेश) -बुलंदशहरयेथील काँग्रेस नेते निजाम मलिक यांनी हाथरस घटनेतील आरोपींचे शीर आणणाऱ्याला 1 कोटीचे बक्षीस जाहीर केले आहे. याप्रकरणी त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
खासदार राहुल गांधी व प्रियांका गांधी-वाड्रा यांना नुकतेच पीडितेच्या घरी जाताना उत्तर प्रदेश पोलिसांना त्यांच्याशी धक्काबुक्की करत त्यांना ताब्यात घेतले होते. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीहल्ला करण्यात आला होता. त्यावेळी मलिक सुद्धा जखमी झाले होते.